मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

By सोमनाथ खताळ | Published: December 23, 2023 05:51 PM2023-12-23T17:51:42+5:302023-12-23T17:52:02+5:30

मनोज जरांगे पाटलांचे ठरलं! २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण, आरक्षण भेटल्याशिवाय माघारी परतणार नाहीच 

Manoj Jarange's Strategy; 3 Crore Marathas will come to Mumbai as soon as they go on hunger strike | मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

बीड : सरकारने आतापर्यंत केवळ वेळ मागितला. परंतू आरक्षणावर काहीच निर्णय घेतला नाही. परंतू आता बस झाले. २० जानेवारपासून मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहे. मला भेटण्यासाठी राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत. त्यांना आडवून दाखवा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनाेज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २३ डिसेंबरला बीडमध्ये जरांगे-पाटील यांची बीडमध्ये निर्णायक इशारा सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. आमच्या मराठ्यांच्या लेकरांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवले. हे सरकारचे षडयंत्र आहे. लेकरांचे मुडदे पडत असताना सरकार हसत आहे. याच्या खुप वेदना होतात. तसेच आरक्षणासाठी सरकारने सुरूवातीला तीन महिने, ४० दिवस नंतर आता २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागितला. परंतू काहीच निर्णय घेतला नाही. मग आम्ही कुठपर्यंत थांबणार? आम्हालाही मर्यादा आहेत. परंतू आता सहनशिलता संपली आहे. त्यामुळे तयारीला लागा. २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहे. मला भेटायला राज्यातील तीन कोटी मराठे येणार आहेत, त्यांना अडवून दाखवा? असे म्हणत सरकाला इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघारी येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अंतरवाली ते मुंबई पायी यात्रा
मी उपोषणाला बसल्यानंतर अंतरवाली ते मुंबई असा पायी यात्रा निघेल.त्याचा मार्ग ठरविण्यात येईल. परंतू सर्वांनी जसे जमेल तसे, जवळ असलेल्या ठिकाणाहून यात सहभागी व्हावे. सर्वांनी आपआपली शेतातील, घरची कामे २० जानेवारीपर्यंत करून घ्यावीत. एकदा निघाल्यावर आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी परतायचेच नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

३ कोटी मराठे मुंबईत येणार
मी उपोषण करत आहे. परंतू मला भेटायला राज्यातील ३ कोटी मराठे येणार आहेत. जेवण, अंथरून-पांघरूनाची ते स्वता: व्यवस्था करतील. पण त्यांच्या नैसर्गिक विधीची व्यवस्था सरकारने करावी. अन्यथा ते कुठेही बसतील. जर घाण झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Manoj Jarange's Strategy; 3 Crore Marathas will come to Mumbai as soon as they go on hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.