मनोरुग्ण पतीकडून पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:25 PM2017-08-12T15:25:07+5:302017-08-12T15:26:52+5:30
मनोरुग्ण पतीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून केल्याची घटना आष्टी शहरातील गोंधळ गल्ली येथे पहाटे ३ च्या सुमारास घडली. आरोपीचे नाव संतोष उर्फ बाळू प्रल्हाद कदम असून मृत महिलेचे नाव मनीषा (३४ ) आहे.
ऑनलाईन लोकमत
बीड, दि. १२ : मनोरुग्ण पतीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून केल्याची घटना आष्टी शहरातील गोंधळ गल्ली येथे पहाटे ३ च्या सुमारास घडली. आरोपीचे नाव संतोष उर्फ बाळू प्रल्हाद कदम असून मृत महिलेचे नाव मनीषा (३४ ) आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी बाळू उर्फ संतोष प्रल्हाद कदम हा मनोरुग्ण आहे , त्याच्यावर गेल्या ५ वर्षापासून अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत. संतोष हा मनिषास सतत कोणत्याना कोणत्या कारणाने मारहाण करत असे. आज पहाटे ३ च्या सुमारास मनीषा झोपेत असताना घरातील पुरण वाटण्याचा पाटा उचलून तिच्या डोक्यात घातला. यावेळी शेजारी झोपलेली त्याची 12 वर्षाची मुलगी जागी असता संतोषने तिला कोणास काही सांगितले अथवा आरडा ओरड केली तर तुलापण मारून टाकेल असा दम दिला. यानंतर त्याने पुन्हा तीन चार वेळेस मनिष्याच्या डोक्यात पाट्याने वार केले. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक डॉ.अभिजीत पाटील, पोलिस निरक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.