Rain in Beed, Ashti: पावसाचे रौद्ररूप : आष्टी तालुक्यात अनेक तलाव ओव्हर फ्लो, नदी नाल्यांना रात्रीत पूर; गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:59 AM2021-09-05T11:59:05+5:302021-09-05T11:59:32+5:30

महसुल विभागाचे नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले

Many lakes in Ashti taluka overflow, river nallas flooded at night; villages lost contact | Rain in Beed, Ashti: पावसाचे रौद्ररूप : आष्टी तालुक्यात अनेक तलाव ओव्हर फ्लो, नदी नाल्यांना रात्रीत पूर; गावांचा संपर्क तुटला

Rain in Beed, Ashti: पावसाचे रौद्ररूप : आष्टी तालुक्यात अनेक तलाव ओव्हर फ्लो, नदी नाल्यांना रात्रीत पूर; गावांचा संपर्क तुटला

googlenewsNext

अविनाश कदम 
आष्टी ( बीड ) : पावसाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करणा-या आष्टी तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून मुसळधार पावसाने रात्रीत नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.काही गावांचा संपर्क तुटला आहे.धामणगांव हायवे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.जोरदार पावसाने शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले. तालुक्यातील कडी नदी अनेक दिवसांपासून पूराच्या प्रतिक्षेत असलेल्या कडी नदीला पूर आला असून आष्टी शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रम्हगावचा तलाव ओव्हर फ्लो झाला सुलेमान देवळा येथील नदीला पूर आला आहे. पाणी पुलावरून वाहत आहे तेव्हा सुलेमान देवळा ते सावरगांव या मार्गांवरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रम्हगाव, बेलगांव,निंबोडी,करंजी,क-हेवडगांव, देविनिमगाव,रूटी इमणगाण,कांबळी, गहूखेल,उदखेल,बावी,चोभा निमगांव हे सर्व तलाव एकाच रात्रीत ओव्हर फ्लो होण्याची पहिलीच घटना घडली आहे.अनेक गावातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.घरांची पडझड झाली आहे.शेतातील पिके पाण्यात गेले असल्याने शेत जलमय झाले या जोरदार पावसाने पाणी साठ्यात वाढ झाली मात्र, उडिद,तुर,कापूस,सोयाबीन,बाजरी,कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.लागवड केलेला कांदा पाण्यात असून जास्त पावसाने जमिनीचे उत्खनन झाल्याने वाहून गेला आहे.काही शेतक-यांचे काढणीला आलेले उडिद,बाजरी पिक ही पाण्यात भिजत असून अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आष्टी तालुक्यात मागिल २४ तासापासून सर्वदूर पाऊस सुरू असून,या पावसाने बरेच तलाव ओहरफ्लो झाले आहेत.त्यामुळे सांडव्यावरून पाणी पडून नदीला पाणी आलेले आहे.नागरीकांनी या वाहत्या पाण्यावरून तसेच नदीच्या कडेला न जावू नये,तसेच पाऊस सुरू असल्यास शेतातही शेतीच्या कामासाठी न जाता झाडाखाली थांबू नये व कुठे काही आपत्ती आल्यास 9922842001 या क्रमांकावर संपर्क साधावा 
-राजाभाऊ कदम ( तहसिलदार आष्टी )

 

कडा,धामणगांव,महसूल मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस 

४ सप्टेंबर रोजी चे महसुल मंडळ निहाय पर्जन्यमान 

आष्टी - ८७.१ 
कडा  - १२६.५
टाकळसिंग - २.३
दौलावडगांव - ७७.८
धामणगांव  - ११९.६
धानोरा  - ६८.६
पिंपळा  - ८०.३

Web Title: Many lakes in Ashti taluka overflow, river nallas flooded at night; villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस