अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 01:04 PM2019-02-22T13:04:03+5:302019-02-22T13:07:03+5:30

बाबू तरूण असल्याने त्याच्या शरीरातील सर्वच अवयव इतरांसाठी कामाचे ठरले.

Many people reborn because of the organ donation of brain dead Babu | अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म

अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म

Next
ठळक मुद्देकुटुंबियांनी घेतला अवयवदानाचा धाडसी निर्णय

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (जि. बीड) : पुनर्जन्म असतो की नाही, हे माहीत नाही. मात्र, पुनर्जन्म अवयवदानातून प्राप्त होतो. ही संकल्पना रुढ केलीय अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथील बाबू गोविंद ढवळे (२६) या तरुणाने. अपघातात बाबूचा मेंदू मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मोठ्या धाडसाने अवयवदानाचा निर्णय घेऊन अनेकांना पुनर्जन्म मिळवून दिला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथील बाबू गोविंद ढवळे हा पुणे येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नोकरी करत होता. १४ फेब्रुवारी रोजी तो मित्रांसह कोल्हापूरकडे जात असतांना कार रस्ता दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला. यात जखमी झालेल्या बाबूला नरसापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. तरीही त्याची हालचाल बंद पडली. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मेंदू निकामी झाला. असून काही तासानंतर त्याचे निधन होईल असे सांगितले.

तरूण वयात कमावता मुलगा गमवावा लागतोय यामुळे ढवळे कुटुंबियांवर दु:खाचा  डोंगर कोसळला. त्याचवेळी बाबूचे मेव्हणे नामदेव माने व रवी भिसे यांनी अवयवदानाची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. बाबूचे वडील गोविंद नरहरी ढवळे, आई जयश्री ढवळे, भाऊ अमोल ढवळे, यांनीही अवयवदानासाठी  संमती दिली. बाबु तर गेला, मात्र त्याच्या अवयदानामुळे इतरांना जीवनदान मिळून त्यांच्या कुटुंबियांना आनंदाचे दिवस येणार आहेत.

बीड जिल्ह्यातील पहिले अवयवदान
बीड जिल्ह्याच्या इतिहासात संपूर्ण अवयवदान करणारा युवक म्हणून बाबू गोविंद ढवळे याचे नाव अजरामर राहणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी नेत्रदान झालेले आहे, मात्र अवयवदान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. धसवाडीसारख्या ग्रामीण भागातील ढवळे कुटुंबियांनी अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला.

सर्वच अवयव कामी
बाबू  तरूण असल्याने त्याच्या शरीरातील सर्वच अवयव इतरांसाठी कामाचे ठरले. ससून रुग्णालय प्रशासनाने त्याचे नेत्र, हृदय, किडनी, लिव्हर, फुफ्फुस, त्वचा व इतर अवयव दान करण्यात आले.

Web Title: Many people reborn because of the organ donation of brain dead Babu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.