कोरडे कुटुंबाच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:26+5:302021-09-18T04:36:26+5:30
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गेल्या महिन्यात दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरडे कुटुंबीयांवर ...
गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथे गेल्या महिन्यात दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हलाखीचे जीवन जणाऱ्या या कुटुंबाच्या मदतीसाठी सकल धनगर समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. कुटुंबाचे सांत्वन करून ९० हजार रुपयांची मदत देण्यात आली. या संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही शासकीय पातळीवर मदतीसाठी निवेदन दिले. यावेळी जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी जि. प. सदस्य जालिंदर पिसाळ, शांतीलाल पिसाळ, प्रा. गणपत काकडे, गजानन काळे यांच्यासह सकल धनगर समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी गावातील काही तरुणांनी या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन किराणा सामान दिले. तसेच गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनीही पंचवीस हजाराची मदत या कुटुंबाला केली आहे.