Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:08 PM2018-07-25T13:08:00+5:302018-07-25T13:11:05+5:30

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज येथील भाजप आमदार  लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

Maratha Kranti Morcha: The stone pelting of protesters at the residence and office of Pawar's MLA Pawar | Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक 

Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक 

Next

गेवराई (बीड ) :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज येथील भाजप आमदार  लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आमदार पवार यांच्या घर आणि कार्यालयावर दगडफेक केली.

गेवराईमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आमदार पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा ठराव मांडावा अशी मागणी करत आंदोलकांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 

यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत आमदार पवार यांच्या घर आणि कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे शहरात तणावाचा वातावरण आहे. 

तत्पूर्वी, आज सकाळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अर्ध नग्न आंदोलन करून ठिय्या मांडला.

Web Title: Maratha Kranti Morcha: The stone pelting of protesters at the residence and office of Pawar's MLA Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.