मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
By सोमनाथ खताळ | Published: September 7, 2023 11:26 AM2023-09-07T11:26:51+5:302023-09-07T11:27:42+5:30
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी आज सकाळी १० वाजेपासूनच जिल्हाभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, बीड शहरात वाहतूक सुरळीत होती. परंतू राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलकांकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत हे चक्काजाम आंदोलन चालणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.