मराठा आरक्षण : न्यायप्रविष्ट उमेदवारांचे भविष्य अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:46 AM2021-02-27T04:46:05+5:302021-02-27T04:46:05+5:30
प्रभात बुडूख बीड : आरोग्य विभागात राज्यभरात विविध पदांच्या ५५०० जागा भरल्या जाणार आहेत. त्या जागांसाठी मराठा आरक्षण ...
प्रभात बुडूख
बीड : आरोग्य विभागात राज्यभरात विविध पदांच्या ५५०० जागा भरल्या जाणार आहेत. त्या जागांसाठी मराठा आरक्षण मिळेल, या अपेक्षेतून उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यामुळे त्यांचे चालान ३०० रुपये इतके होते. दरम्यान, आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे पुन्हा ईडब्लूएस अथवा ‘ओपन’मधून अर्ज वर्ग केले व त्यासाठी असलेली ५०० रुपये फीस असल्यामुळे जास्तीचे २०० रुपये रुपये भरण्याची मुदत दिली होती. या पदांसाठी १ मार्च २१ रोजी परीक्षा होणार आहे. पुढील दोन दिवस सुटी असल्यामुळे शुक्रवारी बँकांमध्ये चालान भरण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र, संबंधित विभागाच्या वेबसाइट बंद असल्यामुळे अनेक उमेदवारांना याचा फटका बसला आहे.
राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्याशिवाय सरकारने भरती प्रक्रिया करू नये, असे आवाहन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आलेले होते. मात्र, कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात असलेली मनुष्यबळाची गरज व त्यावेळची परिस्थिती त्यामुळे ५५०० जागा निघाल्या होत्या. दरम्यान, या जागांसाठी मराठा समाजातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आरक्षणातून अर्ज केल्यामुळे ३०० रुपये चालान बँकेत भरले होते. मात्र, आरक्षण प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या उमेदवारांनी आपले अर्ज ओपन किंवा ईडब्लूएसमध्ये वर्ग केले, ही संख्या राज्यभर मोठी होती. तसेच या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपयांचे चालान असल्यामुळे अतिरिक्त २०० रुपये भरण्याची मुभा दिली होती. आरोग्य विभागाचे वेबसाइट सर्व्हर डाऊन असल्यामुळे चालान भरता आले नाही, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी दिली.
पर्याय उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन
मराठा आरक्षण हे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे न्यायप्रविष्ट राहिलेले आहे. समाजातील उमेदवारांना परीक्षेला बसण्यासाठी चालान भरणे आवश्यक असताना ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. ती सुविधी उपलब्ध करून द्यावी, त्यामुळे पुढील दोन दिवसांत चालान भरता येईल व उमेदवारांचे नुकसान होणार नाही. मराठा समाजातील उमेदवारांना परीक्षेस बसता आले नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे राहुल वायकर, पंचायत समिती सभापती बळीराम गवते व सीए बी.बी. जाधव यांनी दिला आहे.
आरोग्य विभागाचे पॅन अपडेट नाही
आरोग्य विभागाच्या जागेसाठी चालान भरण्यासाठी असलेल्या बँक खात्याचे पॅन कार्ड अपडेट नसल्यामुळे रोज फक्त ५० हजार एवढीच मर्यादा त्या खात्याला होती. तसेच इतर कारणांमुळे उमेदवारांना चालान भरता आले नाही, असे बँक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
===Photopath===
260221\262_bed_36_26022021_14.jpg~260221\262_bed_35_26022021_14.jpg
===Caption===
उमेदवरांनी भरलेले चालन ~बॅंकेसमोर उमेदवर व पालकांची गर्दी