Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:42 AM2018-11-27T11:42:37+5:302018-11-27T11:45:23+5:30
मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन सुरु आहे.
बीड : मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन सुरु आहे. संदीप कदम, किशोर गिराम, अविनाश पवार अशी आंदोलकांची नावे आहेत.
मराठा आरक्षण तात्काळ देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी सुरू केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी, पोलीस, व अग्निशमन दल दाखल झाले. आंदोलकांशी बातचीत करून त्यांना खाली उतरविण्याचा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.