प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:37+5:302021-03-01T04:38:37+5:30
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. मराठी भाषा वाड्मय मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे ...
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. मराठी भाषा वाड्मय मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे हे होते तर भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य हनुमंत सौदागर, मराठी विभागप्रमुख प्रा डॉ. शंकर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण झाले. तसेच काव्यवाचन करण्यात आले. डॉ. चित्रा धामणे यांनी ‘विषारी जळू’ ही कविता सादर केली. प्रा. विजय मस्के, प्रा.एस.टी. मुजावर, प्रा. बचुटे, प्रा. सलीम, प्रा. अमिना फारोखी, प्रा. कलाने, विठ्ठल जामकर यांनीही कविता सादर केल्या. यावेळी प्रा. मातकर, प्रा. देशमुख, प्रा. लोमटे, प्रा. जाधव आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
280221\28bed_5_28022021_14.jpeg