पीक विम्यात मराठवाडा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:09 PM2017-09-19T20:09:50+5:302017-09-19T20:15:34+5:30

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत.

Marathwada leads the crop insurance | पीक विम्यात मराठवाडा आघाडीवर

पीक विम्यात मराठवाडा आघाडीवर

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यातून सर्वाधिक ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्जसर्वात कमी प्रस्ताव ३९६ कोल्हापूर जिल्ह्यातून दाखल

बीड : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत  राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत.
पीक विमा योजना जुलैमध्ये सुरु झाली. यंदा आॅनलाईन भरणा करण्याच्या पध्दतीमुळे अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. कधी सर्व्हर डाऊन, कधी विजेचा तुटवडा,  कधी इतर तांत्रिक अडचणी, बॅँकेत अपुरे कर्मचारी या कारणांमुळे शेतकºयांना ताटकळावे लागले. त्यामुळे आॅफलाईन अर्ज भरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्यावर सेवाकेंद्रांवरुन विमा प्रस्ताव दाखल करण्याबाबत व त्याची स्वतंत्र नोंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. या कालावधीत पावसाने मोठी ओढ दिल्याने अखेरच्या दिवसापर्यंत पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होती.
पीकनिहाय स्वतंत्र प्रस्तावाच्या नोंदीनुसार राज्यातून पीक विम्याचे एकूण ६२ लाख ३६ हजार ४९९ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. यात सर्वाधिक प्रस्ताव ११ लाख ६७ हजार २२३ बीड जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. सर्वात कमी प्रस्ताव ३९६ कोल्हापूर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत.
चौकट -
मराठवाड्यातून बीड ११ लाख ६७ हजार २२३, नांदेड ९ लाख ६० हजार ९१९, जालना ७ लाख ९६ हजार ९०२, लातूर ७ लाख ५२ हजार ७५०, परभणी ५ लाख ९२ हजार २६, उस्मानाबाद ३ लाख ७१ हजार ८७, औरंगाबाद ३ लाख ६३ हजार ७५१, हिंगोली २ लाख २३ हजार ३१२ प्रस्ताव दाखल झाले आहेत.
४६ कोटींचा विमा
बीड जिल्ह्यातील १८ बॅँकांच्या माध्यमातून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकºयांनी खरिपाचा विमा उतरविला. ३४ कोटी ९८ लाख ६९ हजार १२२ रुपयांचा हप्ता भरला. तर सीएससी सेंटरद्वारे २ लाख ७९ हजार ८५८ अर्ज दाखल झाले. आॅनलाइन व आॅफलाइन असा अर्जदारांनी जवळपास १२ कोटींचा विमा उतरविला आहे.

Web Title: Marathwada leads the crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.