मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:37+5:302021-09-18T04:36:37+5:30

बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे ...

Marathwada Mukti Sangram Day celebrated | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

बीड : येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने शानदार संचलन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे, प्रा.बन्सी काळे, मेजर डॉ.जगन्नाथ चव्हाण, डॉ.शंकर धांडे प्रा.ब्रह्मनाथ मेंगडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

--------

बलभीम महाविद्यालय

बीड : येथील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोविड नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालय विकास समिती सदस्य सुनील क्षीरसागर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ॲड.दामोधरराव बागल, प्राचार्य डॉ.वसंत सानप, उपप्राचार्य प्रा.विजय गुंड, प्रबंधक भास्कर सुरवसे, अधीक्षक पी.पी.डावकर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

-----------

जयभवानी शिक्षण संकुल

गढी : तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य व्ही.पी. राठोड, प्राचार्य डॉ.विश्वास कदम, उपप्राचार्य सानप आर.एस., पर्यवेक्षक गायकवाड के.एन. आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राचार्य व्ही.पी. राठोड यांनी ध्वजारोहण केले. सूत्रसंचलन रणजीत बडे आणि कव्हळे यांनी केले.

------------

कृषी पंडित ढेकळे विद्यालय

गेवराई : तालुक्यातील पाडळसिंगी येथील कृषी पंडित भागुजीराव ढेकळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७३वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक ए.एस. थिटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाडळसिंगीचे उपसरपंच गिन्यानदेव चौधरी, सुखदेव दाभाडे, शिवाजी दाभाडे, आत्तम चौधरी, अशोक काळे, प्रकाश धर्मे, पर्यवेक्षक आर.पी. भोसले आदी उपस्थित होते.

-----------

170921\17_2_bed_7_17092021_14.jpg~170921\17_2_bed_6_17092021_14.jpg

जयभवानी~बलभीम कॉलेज

Web Title: Marathwada Mukti Sangram Day celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.