विवाहितेचा छळ; सात आरोपींना दीड वर्षाचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:08+5:302021-08-26T04:36:08+5:30
विवाहितेचा छळ; सात आरोपीना दीड वर्षाचा कारावास कडा : विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी सात आरोपींना दीड ...
विवाहितेचा छळ; सात आरोपीना दीड वर्षाचा कारावास
कडा : विवाहितेचा छळ करून तिला मारहाण केल्याप्रकरणी सात आरोपींना दीड वर्षे कारावास आणि प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. शिंपी यांनी सुनावली.
तालुक्यातील पिंप्री आष्टी येथील विवाहितेने छळ व मारहाणप्रकरणी आष्टी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने ही तक्रार अंभोरा पोलीस स्टेशनला तपासकामी पाठविली. यानंतर अंभोरा पोलीस ठाण्याने या गुन्ह्याचा तपास करून आष्टी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचे साक्षीपुरावे व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत धामणगाव येथील सात आरोपींना कलम ४९८ अ प्रमाणे एक वर्ष साधा कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीस दिवसांचा साधा कारावास; तसेच कलम ३२३ प्रमाणे सहा महिने शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. या महिलेचा विवाह धामणगाव येथील युवकाशी झाला होता. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील चंद्रकांत जावळे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार एस. बी. निंबाळकर यांनी सहकार्य केले.