कडा कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मरकड तर उपसभापतीपदी ढवण यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 04:30 PM2019-11-15T16:30:17+5:302019-11-15T16:33:30+5:30
सभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा दिल्याने झाल्या निवडणुका
आष्टी : कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी व उपसभापती राजेंद्र दहातोंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. अनेक जण इच्छुक असले तरी निवडणूक बिनविरोध होत सभापतीपदी शत्रुघ्न मरकड आणि उपसभापतीपदी अशोक ढवण निवड झाली.
कड कृषी उत्पन्न बाजार समिती आ. सुरेश धस यांच्या गटाच्या ताब्यात आहे. सभापती आणि उपसभापती दोघांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी आज दुपारी १२ वाजता संचालकांच्या बैठकीनंतर नामनिर्देश छाननी माघार आणि त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी शत्रुघ्न मरकड व उपसभापती पदासाठी अशोक ढवण या दोघांची अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक सुरेश केदारे यांच्या देखरेखीत पारपडली.
या निवडीबद्दल सभापती मरकड आणि उपसभापती ढवण यांचे आ. सुरेश धस, जयदत्त धस, संचालक रमजान तांबोळी, राजेंद्र दहातोंडे, शिवाजी अनारसे, अशोक पवार, कमल किरण पोकळे, रावसाहेब गाडे, शिवाजी अनारसे, दत्ता जेवे, सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच योगेश भंडारी, कृषी बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे आदींनी स्वागत केले आहे.