बाजाराची घडी अजुनही विस्कटलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:08 AM2021-07-13T04:08:10+5:302021-07-13T04:08:10+5:30

... स्वच्छतागृहात पाणी टंचाई शिरूर कासार : शहरात प्रदीर्घ कालावधीनंतर सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू झाले होते. मात्र, नव्याचे नऊ दिवस ...

The market clock is still ticking | बाजाराची घडी अजुनही विस्कटलेलीच

बाजाराची घडी अजुनही विस्कटलेलीच

googlenewsNext

...

स्वच्छतागृहात पाणी टंचाई

शिरूर कासार : शहरात प्रदीर्घ कालावधीनंतर सार्वजनिक स्वच्छतागृह सुरू झाले होते. मात्र, नव्याचे नऊ दिवस संपल्यागत या स्वच्छतागृहालाच अस्वच्छतेने वेढले आहे, इथे टाकी आहे, परंतु त्यात पाणीच नसल्याने स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडल्याचे चित्र आहे. याच बाटल्या शौचालयाच्या भांड्यात अडकल्यास ते भांडेच निकामी होण्याची दाट शक्यता आहे. तरी येथे पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.

.....

पाऊस जमिनीला पोटभर परंतू नदीला नाही घोटभर

शिरूर कासार : तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. जमिनीला पोटभर झाला असला तरी नद्यांना मात्र घोटभर पाणी दिसून येत नाही. सिंदफणा नदीला पाण्याचा पूर पाहण्यासाठी डोळे आसुसलेले आहेत.

....

पावसामुळे खताची विक्रमी उलाढाल

शिरूर कासार : तालुक्यात वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरीप हंगामाचा पेरा व कापूस लागवडीखाली पन्नास हजार हेक्टर क्षेत्र आले आहे. आता पाऊस पडत असल्याने खताची विक्रमी उलाढाल होतांना दिसत आहे. खत मागणीच्या अनुषंगाने कृषी विक्रेते वाणतुटीच्या नावाखाली शेतकऱ्याची अडवणूक करून अधिकचे दाम घेत आहेत. बिचारा शेतकरी गरजेपोटी मुकाट्याने आर्थिक फटका सोसत आहे. युरिया खताची टंचाई सध्या दिसून येत आहे.

...

साथ रोगांपासून काळजी घ्या

शिरूर कासार : आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नाल्या धुवून निघाल्या. यामुळे शहरात डासांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी घरोघरी माशांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे साथरोग पसरण्याची चिन्हे आहेत. तरी नागरिकांनी घरातील, बाहेरील उघडे पदार्थ खाऊ नयेत. घरातील पदार्थ झाकून ठेवावेत. पावसाळ्यातील साथरोगांबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहे.

120721\img20210712110014.jpg

फोटो

Web Title: The market clock is still ticking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.