बाजार समिती - नगरपालिकेचा वाद व्यापाऱ्यांच्या मुळावर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:45 AM2021-02-27T04:45:01+5:302021-02-27T04:45:01+5:30
माजलगाव : शहरातील जुन्या मोंढ्यात जागोजागी पाइपलाइन लिकेज झाल्या असून, अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने मोंढ्यात ...
माजलगाव : शहरातील जुन्या मोंढ्यात जागोजागी पाइपलाइन लिकेज झाल्या असून, अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने मोंढ्यात जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने व्यापारी व नागरिक मेटाकुटीला आले आहेत. हे पाणी कोणी काढून द्यावे यावरून बाजार समितीच्या व नगरपालिकेच्या वादात मात्र व्यापारी व नागरिकांना मात्र नाहक त्रास होत आहे.
माजलगाव शहराची हद्द ही सिंदफणा नदीपात्रापर्यंत, मंजरथ रोड, संभाजी चौक व मंजरथ चौकापर्यंत माजलगाव नगरपालिकेची हद्द आहे. नगरपालिकेकडे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने व त्यावेळची बाजार समिती सक्षम असल्याने दोन्ही कार्यालयात अलिखित करार झाला होता की, मोंढ्यातील भागाची स्वच्छता व रस्ते दुरुस्ती करण्याचे काम बाजार समिती अनेक वर्षांपासून करत आली आहे.
सध्या नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर दिले असून, या टेंडरमध्ये केलेल्या करारात मोंढा भागातील कचरा उचलू नये व स्वच्छता करू नये, असे कुठेही म्हटलेले नसताना व नगरपालिका मोंढ्यातील घरमालकांकडून विविध प्रकारचे कर आकारते. असे असताना नगर पालिकेचे मोंढ्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे स्वच्छता गुत्तेदाराचा फायदा होतो आहे.
बाजार समिती व नगरपालिकेच्या वादात कोणीही नाल्या काढत नसल्याने नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असून, जागोजागी पाइपलाइन लिकेज झालेल्या आहेत. यामुळे सध्या मोंढ्यात कोठेही पाहिले की घाण पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे मोंढ्यात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
मोंढा भाग नगरपालिकेच्या हद्दीत नसल्याने नाल्या व स्वच्छता बाजार समितीनेच कराव्यात.
-शेख मंजूर, नगराध्यक्ष
नगरपालिकेसमोर आंदोलन करू
चार दिवसात मोंढा भागातील नळाचे लिकेज व रस्त्यावर येत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर व्यापारी संघाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
सुरेंद्र रेदासनी अध्यक्ष, तालुका व्यापारी संघटना.
दोन दिवसात लिकेज निघतील
मोंढा भागात लिकेजचे पाणी रस्त्यावर आल्यानेच व्यापारी व नागरिकांना त्रास होत आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना आम्ही वेळोवेळी सांगितले आहे. दोन दिवसांत लिकेज काढणार असल्याचे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
-संभाजी शेजुळ, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव
फोटो : माजलगाव शहरातील जुन्या मोंढ्यात जागोजागी पाइपलाइन लिकेज झाल्या असून, अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने मोंढ्यात जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने
===Photopath===
260221\26bed_10_26022021_14.jpg