सेवाधर्म उपक्रमात दहा कुटुंबांना विवाह अर्थसहाय्य निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:52+5:302021-05-28T04:24:52+5:30
परळी : सेवाधर्म उपक्रमांतर्गत बुधवारी तालुक्यातील आणखी १० गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी कृषी ...
परळी : सेवाधर्म उपक्रमांतर्गत बुधवारी तालुक्यातील आणखी १० गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. गोविंदराव फड यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
कोरोनाच्या कठीण काळात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हा सेवाधर्म उपक्रम सुरू असून, जनता कधीच विसरणार नाही, असे यावेळी बोलताना ॲड. फड म्हणाले. कोरोना बाधित होऊन आलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील विवाहास सेवाधर्म उपक्रमांतर्गत हे दहा हजार रुपये अर्थसहाय्य पालकमंत्री मुंडेंच्या वतीने देण्यात आले. आतापर्यंत २०पेक्षा अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे. यावेळी रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक अजिज कच्छी, नितीन रोडे, गोविंद कुकर, सरचिटणीस अनंत इंगळे, राष्ट्रवादी सेवा दलचे अध्यक्ष लाला पठाण, जितेंद्र नव्हाडे, शरद कावरे, सचिन आरसुळे व विवाह सहाय्य निधी प्राप्त कुटुंबीय उपस्थित होते.
===Photopath===
270521\sanjay khakare_img-20210526-wa0054_14.jpg