अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:46 PM2020-02-12T23:46:50+5:302020-02-12T23:47:51+5:30

गत पाच महिन्यांपासून आई-वडिलांकडेच राहत असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे गुरूवारी दुपारी उघडकीस आली.

Marriage suicide in Ambajogai taluka | अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

अंबाजोगाई तालुक्यात विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

अंबाजोगाई : गत पाच महिन्यांपासून आई-वडिलांकडेच राहत असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे गुरूवारी दुपारी उघडकीस आली.
ज्योती मंगेश शिंदे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. ज्योती गत पाच महिन्यांपासून माहेरी पाटोदा (ममदापूर) येथे राहत होती. गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तिचे आई-वडील शेतात निघून गेले तर भाऊ आकाश हा महाविद्यालयात गेला होता. त्यानंतर ज्योतीने राहत्या घरी लोखंडी आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश दुपारी ३ वाजता परतला असता हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच ज्योतीच्या आई-वडिलांनी घराकडे धाव घेतली. आत्महत्या कुठल्या कारणास्तव केली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marriage suicide in Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.