मास्क शिवणकाम, जनजागृती प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:04 AM2021-02-21T05:04:22+5:302021-02-21T05:04:22+5:30
ऑनलाइन महिला मेळावा बीड : येथील स्वा. सावरकर प्राथमिक विद्यालयाचा महिलांचा उद्बोधन मेळावा हा ऑनलाइन घेण्यात आला. यावेळी ६५ ...
ऑनलाइन महिला मेळावा
बीड : येथील स्वा. सावरकर प्राथमिक विद्यालयाचा महिलांचा उद्बोधन मेळावा हा ऑनलाइन घेण्यात आला. यावेळी ६५ महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षा म्हणून विजया काळे, प्रमुख अतिथी, वक्ते म्हणून वंदना उम्रजकर होत्या. वंदना उम्रजकर यांनी ‘सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप विजया काळे यांनी केले. प्रास्ताविक सारिका सूर्यवंशी यांनी केले. पदगायन मंजुषा निमगावकर यांनी केले. आभार संजीवनी चाटोरीकर, सूत्रसंचालन सुजाता माने यांनी केले.
शिधापत्रिका
तात्काळ वाटप करा
बीड : येथील जिल्हा बँकेमधील निराधार लाभार्थ्यांचे खाते आहेत ते चालू ठेवावेत, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेमध्ये नवीन लाभधारकांचे खाते उघडण्यात यावेत, निराधार लाभधारकांना विनाअटी जीआर प्रमाणे पिवळ्या शिधापत्रिका देऊन धान्य वितरित करून बारा अंकी आईनलाइन नंबर देण्यात यावेत, याकरीता सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेकडून निराधार लाभधारकांची होत असलेली पिळवणूक व शोषण तात्काळ बँद करावे, यासाठी १८ रोजी लाेकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या उपस्थितीत उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने झाली.