वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाखांचे साहित्य चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:44 PM2020-12-22T18:44:05+5:302020-12-22T18:47:07+5:30
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊन आहे
परळी : तालुक्यातील कौठळी शिवारातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअर्र व वर्कशॉप गोदामातून 37 लाख 84 हजार रुपयां च्या साहित्य चोरी ची घटना घडली. याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊन आहे. याठिकाणी १७ ऑक्टोबर 2020 रोजी चोरीची घटना घडली .या संदर्भातील माहिती स्टोअर किपर जी. टी. मुंडे यांनी कारखान्याच्या लिपिक व लीगल इंचार्ज जमीन शेख यांना कळविली. त्यावरून कारखान्याचे कार्यकारी संचालक जीपीएसके दीक्षितलू व स्टोर कीपर मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी स्टोअर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊनच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकवलेले दिसून आले.
आतमधील साखर कारखान्याचे संगणक संच, कपर मटेरियल, बुश साउंड बार, मिल बेरिंग असे एकूण 37 लाख 84 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून 22 डिसेंबर 2020 रोजी रोजी जमीन शेख यांनी परळीग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवलाल पूर्भे हे करीत आहेत.