पन्नास एकर गायरानातील पिकावर माथेफिरूने तणनाशक फवारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:37 AM2021-08-20T04:37:56+5:302021-08-20T04:37:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : मागासवर्गीय भूमिहीन लोकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पेरलेल्या पन्नास एकर क्षेत्रावरील खरिपाच्या पिकावर अज्ञात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : मागासवर्गीय भूमिहीन लोकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पेरलेल्या पन्नास एकर क्षेत्रावरील खरिपाच्या पिकावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारून नुकसान केल्याची घटना तालुक्यातील लाडेगाव येथे घडली.
केज तालुक्यातील लाडेगाव येथे सर्व्हे नंबर १४३ गायरान जमिनीतील ५० एकर क्षेत्रावर अतिक्रमण करून त्यांनी त्यात सोयाबीन तूर, मूग, बाजरी, उडीद आदी खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. त्या पिकावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी रात्री ते १५ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान अज्ञात माथेफिरूने गायरान जमिनीतील पीक कापून नासधूस केली. उभ्या पिकाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने तणनाशक फवारले. यामुळे त्यातील पिकांचे नुकसान झाले आहे.
१५ ऑगस्ट रोजी भीमराव धिरे, बालू घिरे, मोहन धिरे, वचिष्ट धिरे, लक्ष्मण धिरे, अंकुश धिरे, रावसाहेब धिरे हे पेरणी केलेल्या गायरान जमिनीतील पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता पिकात मानवी पाऊलखुणा दिसून आल्या. पीक जळून गेलेले दिसले, तसेच पीक कापून नुकसान केल्याचे दिसून आले. याप्रकरणी भीमराव धिरे यांनी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात माथेफिरूविरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
170821\24152050-img-20210817-wa0030.jpg~170821\24152050-img-20210817-wa0026.jpg
लाडेगाव येथील पन्नास एकर गायरान जमिनीतील पिकावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारले.~लाडेगाव येथील पन्नास एकर गायरान जमिनीतील पिकावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारले : पोलिसात तक्रार