चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:17 AM2017-12-14T00:17:47+5:302017-12-14T00:20:26+5:30

विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला.

Mauli took away Ekadashi from the stolen charge | चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास

चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देविणेक-याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ

परळी (जि. बीड) : विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला.

सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील गंगापिंप्री येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले होते़ या सप्ताहामध्ये वैजनाथ रंगनाथ रोडे यांनी लिंबाजी यांना सात दिवसांसाठी १५०० रुपये ठरवून विणेकरी म्हणून बोलावले होते़ तसेच सातभाई यांची रोडे यांच्या घरी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती़.

४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घरावरील सज्जामध्ये ठेवलेल्या १५ ते २० ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायचा आहे़, असे म्हणून ग्रंथ पाहत असताना ग्रंथाच्या पाठीमागे ठेवलेली पाच तोळे सोन्याची दागिन्याची पिशवी चोरून नेली़, अशी तक्रार वैजनाथ रोडे यांनी सोनपेठ पोलिसांकडे दिली. त्यावरुन ११ डिसेंबर रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात लिंबाजी यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला होता.

खोटा गुन्हा दाखल केला म्हणून लिंबाजी तणावग्रस्त होते. मंगळवारी रात्री शेवटचा राम राम म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. त्यामुळे अख्ख्या गावाने त्यांची समजूत घातली. तरीही समाधान न झाल्याने त्यांनी बुधवारी सकाळी एकादशीच्या दिवशी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. उसाला पाणी देण्यासाठी त्यांचे भाऊ वाल्मिक सातभाई सकाळी गेले असता ही घटना उघडकीस आली. सकाळी ११ च्या सुमारास लिंबाजी यांचा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, पाच भाऊ असा परिवार आहे.

४० वर्षांची विणेकरी सेवा
लिंबाजी सातभाई पाच भावांत सर्वांत मोठे. त्यांना दीड एकर जमीन आहे. एक मुलगा शेती करतो तर दुसरा ऊसतोड कामगार आहे. लिंबाजी यांना गावात सर्वच जण माऊली म्हणून संबोधित होते. गेल्या ४० वर्षांपासून सप्ताहामध्ये राज्यभरात कोठेही ते विणा वावाजविण्यासाठी जायचे.

ग्रामस्थ आक्रम
खोटा गुन्हा दाखल करणा-याविरूद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थ, नातेवाईक आक्रमक झाले होते. माजी सरपंच माणिकराव सातभाई, भीमराव सातभाई, बबन सातभाई, अशोक सटाले, विनायक सातभाई, विजय लुगडे, वाल्मिक सातभाई आदींनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रोडेविरूद्ध गुन्हा
लिंबाजी सातभाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापिंपरी येथील वैजनाथ रोडे याच्याविरूद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लिंबाजी सातभाई यांचा मुलगा श्रीधर याने ही फिर्याद दिली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कैलास सपकाळ यांनी दिली.

खिशात डायरी अन् हरीपाठ
घटनास्थळी पोलिसांना लिंबाजी यांच्या शर्टच्या खिशात हरीपाठ आणि डायरी सापडली. डायरीत त्यांनी अनेक अभंगही लिहिलेले आढळून आले आहेत.

पोलिसांकडून झाली होती चौकशी
लिंबाजी यांना शुक्रवारी सोनपेठ पोलीस ठाण्यात घेऊन या, असा निरोप सोनपेठच्या पोलिसांनी मोबाईलवरून त्यांच्या भावास दिला होता. भावाने हा निरोप लिंबाजी यांना सांगितला होता. सोने चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ११ डिंसेबर रोजी सोनपेठचे पोलीस तडोळी गावात चौकशीसाठी आले होते, अशी माहिती वाल्मिक सातभाई यांनी दिली.

Web Title: Mauli took away Ekadashi from the stolen charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.