एम.डी.सिंह यांची बदली; आस्तिककुमार पांडेय नवे जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:45 AM2019-02-21T00:45:41+5:302019-02-21T00:45:59+5:30
जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बुधवारी बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची बुधवारी बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवारी राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यामध्ये बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर अकोला येथील जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ बीड येथे रुजू होण्याचे आदेश अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले आहेत.
दुष्काळी परिस्थिती, राजकीय दबाव व प्रशासनातील अधिका-यांची रिक्त पदे अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजबद्ध कामकाज करण्याचा नेहमी प्रयत्न केला.
ी एम. डी. सिंह यांच्या जागेवर अकोला येथील जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती झाली आहे.
अकोला जिल्ह्यात त्यांनी विविध योजना अतिशय प्रभावीपणे राबवल्या होत्या. यामध्ये नदी स्वच्छता, जलसंधारणाची कामे व शेतकºयांना उपयुक्त असणाºया कामांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. अकोला जिल्ह्यातील मोरणा नदी मृत झाली होती. तसेच त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून मोरणा नदीची स्वच्छता करुन पुन्हा नदी जिवंत केली आहे.
बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, नापिकी, पाणी संकट व शेतक-यांची परिस्थिती सुधारण्याचे कठीण आव्हान पांडेय यांच्यासमोर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था तसेच येणा-या निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्याची कठीण जबाबदारी पांडेय यांना पेलावी लागणार आहे.