कोविड रुग्णांना महावितरण कर्मचाऱ्यांकडून भोजन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:31 AM2021-05-15T04:31:47+5:302021-05-15T04:31:47+5:30
तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, गावेच्या गावे कोरोनाबाधित होत आहेत. अशातच कोरोनाबाधितांना व त्यांच्या नातेवाइकांना लाॅकडाऊन ...
तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, गावेच्या गावे कोरोनाबाधित होत आहेत. अशातच कोरोनाबाधितांना व त्यांच्या नातेवाइकांना लाॅकडाऊन असल्याने बाजारातूनही काही आणता येत नाही. शहरातील आयटीआय येथील कोविड केअर सेंटरवर १२ मे रोजी दुपारी महावितरण कंपनीच्या आष्टी येथील कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार, सहायक अभियंता दत्तात्रय दसपुते, मुबीन सय्यद व महावितरण कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बुधवारी कोविड केअर सेंटरवरील रुग्णांना एक वेळेचे जेवण देण्याचा मानस उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार
यांना बोलून दाखविला. त्यांनीही सहमती
दर्शवली व मदतही केली.
एक वेळेचे जेवण दिल्याने
आम्हाला समाधान वाटले.
-शिवाजी गोरे, कर्मचारी महावितरण कंपनी, आष्टी.
===Photopath===
130521\2753img-20210513-wa0438_14.jpg