सार्थक सिद्धी गोशाळेत लावली ३०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:07+5:302021-06-11T04:23:07+5:30
बीड : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बीड व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ...
बीड : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बीड व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील आनंदवाडी येथील सार्थक सिद्धी गोशाळेत व लगतच्या परिसरात ३०० झाडे लावण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते, सहायक संरक्षक एन.व्ही. पाखरे, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलांगे, वनीकरण विभागाचे रमेश राऊत आदी अतिथी म्हणून उपस्थित होते.
दरवर्षी रोटरीच्या वतीने पर्यावरण सप्ताह साजरा केला जातो. या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रास्ताविकात विभागीय वनअधिकारी सातपुते यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद करून प्रत्येक व्यक्तीने ३ झाडे लावण्याचे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी लावलेल्या झाडांचे संवर्धन आवश्यक असून रोटरीने यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन अक्षय शेटे यांनी केले. राजेंद्र मुनोत यांनी आभार मानले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष मुकुंद कदम, सचिव प्रा. सुनील खंडागळे, गोशाळेच्या संचालिका ज्योती मुनोत, उमा औटे, अभय कोटेचा, वाय. जनार्दन राव, सुरज लाहोटी, विलास बडगे, विकास उमापूरकर, आनंदवाडीचे सरपंच देवकते, विष्णू देवकते, जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष जैन, अमित पगारिया, आदेश नहार, सचिन कांकरिया, रोशन ललवाणी, निलेश ललवाणी, धनंजय ओस्तवाल, सुनील औटी, गुड मॉर्निंगचे सदस्य, राजस्थानी सेवा समाजाचे अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश जाजू व सचिव रामेश्वर कासट, प्रमोद मणियार, ॲड. विजय कासट तसेच सामाजिक वनीकरण विभागाचा स्टाफ, रेशीम कोष विभागाचे अधिकारी, आनंदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
100621\10_2_bed_1_10062021_14.jpeg
===Caption===
गोशाळेत वृक्षारोपण