बीडमध्ये २५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, कंपाऊडर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:12 PM2018-12-15T15:12:51+5:302018-12-15T15:16:10+5:30

तक्रारदाराचे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन थकले होते.

Medical Officer, Compounder arrested while taking a bribe of 25,000 in Beed | बीडमध्ये २५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, कंपाऊडर जाळ्यात

बीडमध्ये २५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, कंपाऊडर जाळ्यात

Next
ठळक मुद्देवेतन काढण्यासाठी मागितली होती लाचएसीबीची आरोग्य केंद्रातच कारवाई 

बीड : वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाना (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी ११ वाजता आरोग्य केंद्रातच केली. 

महादेव पांडूरंग केंद्रे हे वैद्यकीय अधिकारी आहेत तर प्रशांत बापूराव चोटपगार असे कंपाऊडरचे नाव आहे. तक्रारदाराचे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन थकले होते. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या मंजूर रकमेचा धनादेश काढण्यासाठी डॉ. केंद्रे यांनी २५ हजार रूपयांची लाच मागितली होती. परिस्थिती हालाकिची असल्याने तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. मात्र केंद्रे यांनी ऐकले नाही. अखेर संतापलेल्या कर्मचाऱ्याने थेट एसीबी कार्यालय गाठून ६ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविली.

पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी आपल्या टिममार्फत शनिवारी भावठानच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला. कर्मचाऱ्याकडून थेट लाच स्विकारण्याऐवजी हे पैसे कंपाऊडर प्रशांतकडे देण्यास केंदे्र यांनी सांगितले. त्याप्रमाणे कर्मचाऱ्याने प्रशांतकडे पैसे देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडप घालत त्याला पकडले. त्यानंतर डॉ.केंद्रेला त्यांच्या कक्षातून अटक केली. दोघांविरोधातही अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू होते. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस.आर.जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे  पाटील, विकास मुंडे, दादासाहेब केदार, अमोल बागलाने, मनोज गदळे, चालक नदीम यांनी केली.

Web Title: Medical Officer, Compounder arrested while taking a bribe of 25,000 in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.