उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बीड येथे बूथ प्रमुखांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:33 PM2018-10-22T23:33:13+5:302018-10-22T23:33:54+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुथप्रमुख व गटप्रमुखांचा मेळावा २३ आॅक्टोबर रोजी बीड येथे होत आहे.

A meeting of the booth chiefs in Beed today in the presence of Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बीड येथे बूथ प्रमुखांचा मेळावा

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज बीड येथे बूथ प्रमुखांचा मेळावा

Next
ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुथप्रमुख व गटप्रमुखांचा मेळावा २३ आॅक्टोबर रोजी बीड येथे होत आहे. या मेळाव्यात ते पक्षप्रमुख बुथप्रमुख व गटप्रमुखांशी वैयिक्तक चर्चा करणार आहेत. बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून सर्व बुथप्रमुख व गटप्रमुखांसह शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांनी केले आहे.
पक्षप्रमुख ठाकरे हे आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती घेणार आहेत. सदर मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मराठवाडा संपर्कप्रमुख खा चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संपदा गडकरी, माजीमंत्री बदामराव पंडित, सहसंपर्कप्रमुख माजी आ सुनील धांडे, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, विधानसभा संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर, प्रकाश तेलगुटे, सुनील विचारे, अनिल विचारे, मिलिंद मांडाळकर, मापानकर, आदींसह शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांची मेळाव्यास उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांनी यावे, यासाठी संपूर्ण जिल्हाभरात मेळावे, बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्यास बुथप्रमुख व गटप्रमुखांसह शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक यांनी केले आहे.
‘बीड जिल्ह्यात शिवसेना जोरदार मुसंडी मारणार’
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. संपर्क अभियान आणि गाव तिथे शिवसेनेची शाखा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण बीड जिल्हा ढवळून काढला. या संपर्क अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याच्या तयारी संदर्भात मुळूक आणि खांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, साहेबांच्या दौºयामुळे शिवसैनिकांत उत्साह निर्माण झाला आहे. त्यांचा हा दौरा म्हणजे जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उत्साह वाढविणारा ठरणार आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्टÑवादीचे आणि आता भाजपाचे वर्चस्व असलेल्या बीड जिल्ह्यात आता शिवसेनेने कात टाकली असून जोमाने कामाला लागली आहे.
जिल्ह्यातील बीड, माजलगाव आणि गेवराई विधानसभा मतदार संघात आमची विजयश्री निश्चित असून परळी, आष्टी आणि केज मतदारसंघात शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यावर भर दिला असल्याचे सचिन मुळूक आणि कुंडलिक खांडे यांनी सांगितले.
मेळाव्याची जय्यत तयारी चालू असून मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. वॉर्ड आणि बूथप्रमुखांशी उद्धव ठाकरे हे संवाद साधणार असल्यामुळे त्याचा फायदाही शिवसेना वाढीसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
४ बीड, माजलगाव आणि गेवराईमध्ये मतदारांनी शिवसेनेवर खूप प्रेम केले आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी जि.प.मध्ये चार सदस्य निवडून आणून आगामी विधानसभेवरही भगवा फडकेल, असे सूचित केले आहे, असेही मुळूक आणि खांडे यांनी सांगितले.

Web Title: A meeting of the booth chiefs in Beed today in the presence of Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.