आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या ‘उभारी’साठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:32 AM2018-12-18T00:32:10+5:302018-12-18T00:33:07+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील अधिका-यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील अधिका-यांना दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक एम.एल. चपळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना देण्यात येणाºया कौशल्य विकास, आरोग्य विषयक उपचार, कर्ज, वैरण विकास, शेती व घरामध्ये वीज जोडणी, विहीर, शेत तळे, गॅस जोडणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शुभ मंगल सामूहिक विवाह योजना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, शौचालय, घरकुल, जनधन बँक खाते, कुटुंब अर्थ सहाय्य योजना, संगयो अंतर्गत वेतन या योजनांची मागणी केलेल्या प्राप्त कुटुंबियांची संख्या व त्यांना देण्यात आलेल्या योजनेच्या लाभाच्या माहितीचा तालुकानिहाय आढावा घेवून प्रलंबित योजनेचा लाभ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाºयांनी तालुकास्तरावर बैठका घेवून या कामाचा आढावा घ्यावा. ज्या कुटुंबांनी विहीर, शेततळे, शैक्षणिक मदत, घरकुल यासारख्या बाबींची मागणी केली आहे त्या योजनेचा लाभ देण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे सांगत आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना उभे करण्यासाठी जास्तीत जास्त योजनेचा लाभ त्यांना देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी अधिकारी व कर्मचाºयांना केल्या. या बैठकीस जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.