जय भवानी विद्यालयात शाळा सुरू करण्याबाबत घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:23 AM2021-07-18T04:23:59+5:302021-07-18T04:23:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोखंडी सावरगाव : येथील जय भवानी विद्यालयात आठवी ते दहावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यासंदर्भात ...

Meeting held at Jay Bhavani Vidyalaya regarding starting school | जय भवानी विद्यालयात शाळा सुरू करण्याबाबत घेतली बैठक

जय भवानी विद्यालयात शाळा सुरू करण्याबाबत घेतली बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोखंडी सावरगाव : येथील जय भवानी विद्यालयात आठवी ते दहावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते कोरोनाचे सर्व नियम पाळून मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करून व पालकाचे सहमती पत्र घेऊन आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे एकमताने ठरले.

यावेळी मुख्याध्यापक राम शेळके, पर्यवेक्षक रमजान पठाण, उपसरपंच सिद्धार्थ बनसोडे, ज्ञानोबा माचवे, कल्याणराव गायकवाड, दिलीपराव वाघाळकर, रावसाहेब बनसोडे, मधुकर कदम, करण बनसोडे, अमृता राऊत, मुद्रिकाबाई गायकवाड, स्वाती देशमाने, शीतल जगताप, मन्नाबी शेख यांच्यासह पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. बी. जोशी यांनी केले. आभार गोपाळ पांचाळ यांनी मानले. बैठक व्यवस्थित पार पाडण्यासाठी संतोष खमितकर, मनोज देशमुख, ऋषिकेश नाईकवाडे, विकास बनसोडे, गणेश राऊत यांच्यासह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

170721\20210716_115948.jpg

लोखंडी सावरगाव येथील जय भवानी विद्यालयात आठवी ते दहावी चे ऑफलाइन वर्ग सुरू करणे बाबत एक बैठक घेण्यात आली

Web Title: Meeting held at Jay Bhavani Vidyalaya regarding starting school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.