‘आधार माणुसकी’अंतर्गत ११ गावांत मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:09 AM2017-11-15T00:09:22+5:302017-11-15T00:10:52+5:30

‘आधार माणुकीचा’ या व्यासपीठांतर्गत तालुक्यातील विविध गावात झालेल्या मेळाव्यांनी अनेक कुटुंबामध्ये जगण्याची उमेद निर्माण केली.

Meetings in 11 villages under 'Aadhar Manusaki' | ‘आधार माणुसकी’अंतर्गत ११ गावांत मेळावे

‘आधार माणुसकी’अंतर्गत ११ गावांत मेळावे

Next
ठळक मुद्देमेळाव्यांतून समुपदेशनआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १४१ मुले, मुलांना साहित्य वाटप

अंबाजोगाई : ‘आधार माणुकीचा’ या व्यासपीठांतर्गत तालुक्यातील विविध गावात झालेल्या मेळाव्यांनी अनेक कुटुंबामध्ये जगण्याची उमेद निर्माण केली.

‘आधार माणुसकीचा’ हे व्यासपीठ आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नावर काम करते. यापुढे तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्या होवू नयेत म्हणून जे निराशावादी आहेत, अशांचे समुपदेशन व्हावे यासाठी हे जनजागृती मेळावे घेण्यात आले. २१ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी प्रत्येकी एका गावात असे ११ गावात हे मेळावे झाले. त्यात आदर्श शिक्षिका मीरा कदम यांनी प्रबोधन केले. या कार्यक्रमांना महिलांचीही मोठी उपस्थिती होती.

तालुक्यातील मुडेगाव, वरपगाव, सनगाव, मोरेवाडी, चतुरवाडी, डोंगरपिंपळा, जोगाईवाडी, सेलूअंबा, कुंबेफळ, नांदगाव, पूस या गावात हे कार्यक्रम झाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, एचआयव्ही बाधित आणि समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणार असल्याचा निर्धार अ‍ॅड. संतोष पवार यांनी केला आहे.

पवार यांनी जोगाईवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपदी तीन वर्षे व कै. डॉ. विमलताई मुंदडा यांचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रीयपणे काम केले. परंतु मागील वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा सर्वे केला असता या कुटूंबाच्या व्यथा, दु:ख व समस्या जाणल्या असता मनाला अती वेदना झाल्या. त्याचवेळी आपण या वंचित घटकांसाठी काम करण्याचे ठरविले. या वर्षभरात आधार माणुसकीचा व्यासपीठातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १४१ मुले, मुली व एचआयव्ही बाधीत ४० मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम सुरू केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना राज्य शासनाने सर्व शासकीय योजना व सुविधा प्राधान्याने पुरवाव्यात, अशी मागणीही अ‍ॅड. पवार यांनी या वेळी केली आहे.

  ग्रामस्थांशी संवाद
 खेडे गावात मंदिर हेच ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे महत्वाचे ठिकाण असते. शेतातून आल्यानंतर सर्वजण याच ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे ‘आधार माणुसकीचा’ या व्यासपीठाचे प्रमुख अ‍ॅड. संतोष पवार यांनी मंदिरात कार्यक्र म घेऊन ग्रामस्थांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.  विविध गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व  युवकांनी या उपक्र मांसाठी पुढाकार घेतला.

Web Title: Meetings in 11 villages under 'Aadhar Manusaki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.