आष्टी तालुक्याला पुन्हा पावसाचा तडाखा; मेहकरी नदीच्या पुराने दहा गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 02:52 PM2022-10-18T14:52:38+5:302022-10-18T14:54:24+5:30
सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मेहकरी नदीला पूर आला.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : मागील आठ दिवसांपासून आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर सोमवारी रात्रीपासून जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मेहकरी नदीला पूर आला. यामुळे नदीपात्रावरील दहा गावांचा संपर्क तुटला आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा, लोणी, पारोडी, बोरोडी, खरडगव्हाण, सोलापूर वाडी, कुंटेफळ, नांदुर, या परिसरात सोमवारी रात्रभर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे मेहकरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. नदीस पहाटे मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने दहा गांचा संपर्क तुटला. नांदुर नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात यावी. यामुळे दळणवळण सोपे होईल अशी मागणी येथील सरपंच आजिनाथ विधाते यांनी केली आहे.