संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:33+5:302021-09-07T04:40:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मोबाईलचा वाढता वापर आणि शहरीकरण, अपेक्षा वाढल्याने धावपळ वाढली. या सर्वांमुळे एकमेकांमधील संवादाची दरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मोबाईलचा वाढता वापर आणि शहरीकरण, अपेक्षा वाढल्याने धावपळ वाढली. या सर्वांमुळे एकमेकांमधील संवादाची दरी दुरावत गेली. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिडण्याची दाट शक्यता असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मैदानी खेळांसह एकत्रित गप्पा मारून सुख-दु:खाच्या गोष्टी एकमेकांशी बोलून दाखवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यामुळे चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत घरातच बसले. उठसूट तेच तेच माणसे असल्याने लोकांनी संवाद करण्याऐवजी मोबाईलला जवळ केले. यामुळेच ताण, तणावाचे ररुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले.
मन हलके करणे हाच उपाय
n ताणतणाव आल्यास आपले सुख-दु:ख इतरांशी बोलून दाखवा
n अडीअडचणी इतरांना सांगितल्यास मन हलके होते, यातून आपण तणावमुक्त व्हाल
n इंटरनेटचा वापर कमी करून मैदानी खेळांवर अधिक भर द्यावा, संवाद वाढवावा
n एकांतात न राहता संघटित राहून सामाजिक संवाद ठेवणे गरजेचे आहे.
---
संवाद कमी झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते. वाढते शहरीकरण, तरुणांकडून होणारा इंटरनेट व मोबाईलचा अतिवापर हेच याची कारणे आहेत. पूर्वी मैदानी खेळासाठी सर्व एकत्र येत होते; परंतु आता मैदानी खेळही मोबाईलवरच ऑनलाईन खेळताना दिसतात. यामुळे तणाव वाढतो. सोशल संवाद ठेवून संघटित राहण्यावर भर द्यावा.
डॉ. मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड.