५० टक्के अनुदानावर मिळणार दुधाळ जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:40 AM2021-02-17T04:40:02+5:302021-02-17T04:40:02+5:30
शासनाच्या वतीने मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर शेतीला जोडधंदा म्हणून नवीन योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर दुधाळ गट व शेळी गट वाटप ...
शासनाच्या वतीने मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर शेतीला जोडधंदा म्हणून नवीन योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर दुधाळ गट व शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. दोन देशी अथवा संकरित गायी योजनेत प्रती गाय खरेदीसाठी ५६ हजार रुपये मूल्य व परराज्यातून वाहतूक खर्चासाठी ५ हजार रुपये तर प्रती गाय खरेदी व विमा यासाठी ५१ हजारांची तरतूद आहे. तर गटासाठी १ लाख १२ हजार रुपयांची तरतूद आहे. या योजनेत ५६ हजार रुपयांचे अनुदान मिळेल. दोन म्हशीचा गट योजनेत १ लाख ३२ हजार रुपये, तर २० शेळ्या व दोन बोकड, शेळी गट योजनेसाठी १ लाख ३४ हजार रुपयांची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत गोठा व विविध माहितीसाठी तालुका स्तरावर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडे संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. या दुधाळ गट योजनेसाठी दोन टप्प्यात ५० टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ फेब्रुवारीपर्यंत पशुवैद्यकीय रुग्णालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अंबाजोगाई पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे यांनी केले आहे.