कपिलधारमध्ये लाखो भाविकांची हजेरी
By admin | Published: November 14, 2016 01:17 PM2016-11-14T13:17:34+5:302016-11-14T13:14:52+5:30
संत मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी असलेल्या श्री. क्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सोमवारपासून यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १४ - संत मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी असलेल्या श्री. क्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सोमवारपासून यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गुरुनाथ माऊलींच्या जयघोषाने मंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. लाखो भाविकांनी दाटीवाटीत दर्शनाचा लाभ घेतला.
कपिलधार येथे डोंगरद-यात असलेल्या पुरातन मंदिरावर रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोप-यासह राज्याबाहेरुन रविवारीच दिंड्या दाखल झाल्या. संस्थानतर्फे भक्तांच्या निवासाची मोफत सोय करण्यात आली आहे. यंदा धुवाधार पावसामुळे मंदिर परिसरातील धबधबा धो- धो वाहत आहे. तेथे ‘सेल्फी’ घेण्याचा मोह अनेक भाविकांना आवरता आला नाही. या यात्रोत्सवात कुठलाही गैरप्रकार होऊ नये, दर्शन सुरळीत व्हावे याकरता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी संत- महंतांच्या उपस्थितीत प्रथमच वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा होत आहे. त्यानंतर शासकीय महापूजा असून मंत्री सुधीर मुनंगंटीवार, महादेव जानकर, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थिती राहणार आहेत.