माजलगाव पालिकेवर एमआयएम, भारिपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:44 AM2018-12-18T00:44:39+5:302018-12-18T00:45:53+5:30
एमआयएम व भारिपच्या बहुजन वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी ‘जवाब दो’ आंदोलन करत सोमवारी माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : एमआयएम व भारिपच्या बहुजन वंचित आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी ‘जवाब दो’ आंदोलन करत सोमवारी माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
२०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये दलितवस्ती सुधार योजना, गलिच्छ वस्ती सुधार योजना, ओपन स्पेस विकास निधी किती आला, चालू करण्यात आलेली पाईप लाईन टेंडर न काढता चालू करण्यात आली त्याची माहिती द्यावी, शौचालयाचे काम पूर्ण न करता अर्धवट करून काही लोकांनाच पैसे दिले व काही लोकांचे पैसे विनाकारण अडवण्यात आले आहेत ते त्वरित देणे, बंद पडलेली शौचालय बांधकामाचे योजना पुन्हा सुरू करावी, मुख्य रस्त्यावर मुतारी बांधण्यात यावी, मोंढा येथील पाणी टाकीचे बांधकाम सुरु करणे, नाली सफाई करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, धम्मानंद साळवे, बबन वडमारे, अनिल डोंगरे, समशेर पठाण, रमेश, शाकीर भाई शेख, शेख नजीर, आनंद साळवे, बबन वडमारे, शेख नजीर, रौफ लाला, मोमीन शेख, सादिक शेख, हाफेस मौलाना आदींसह मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.