नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:15+5:302021-08-29T04:32:15+5:30
बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किमीचे काम पूर्ण व ३० किमीचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर रेल्वे ...
बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किमीचे काम पूर्ण व ३० किमीचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी घेण्यात यावी. उर्वरित बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
२६ ऑगस्ट रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची औरंगाबाद येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट घेतली. मुंबई ते नागपूर हा समृद्धी मार्ग सुरू होत आहे. या मार्गाच्या समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देशात नवीन बुलेट ट्रेनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्या नवीन मार्गामध्ये या मार्गाचा समावेश करण्यात यावा. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा व विदर्भाचे दळणवळण सुधारेल आणि औरंगाबाद व नागपूर या शहरातील व्यापार व उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकेल. या नवीन रेल्वे मार्गाची योग्यता तपासून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी विनंती क्षीरसागर यांनी दानवे यांच्याकडे केली.
280821\28_2_bed_12_28082021_14.jpg
रेल्वे राज्यमंत्री