पाटोदा तालुक्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू; तिघांविरोधात खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:45 PM2017-12-07T23:45:13+5:302017-12-07T23:45:16+5:30
पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथील एका शेतातील विहिरीत गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह ३ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. याप्रकरणी महिनाभरानंतर तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : तालुक्यातील मंगेवाडी येथील एका शेतातील विहिरीत गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह ३ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. याप्रकरणी महिनाभरानंतर तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
निकीता उर्फ रुपाली बाळु शिंदे (१५, रा. करचुंडी, ता. बीड) असे मयत मुलीचे नाव आहे. तिचे आजोबा कल्याण ज्ञानोबा ढेरे (रा. मंगेवाडी, ता. पाटोदा) यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार घरची परिस्थिती हलाखीची असल्याने निकिता मागील पाच वर्षांपासून आजोळी मंगेवाडी येथे शिक्षणासाठी राहत होती.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकिता जनावरे चारण्यासाठी शेतात गेली असता आकांक्षा मनोहर ढेरे (रा. मंगेवाडी) या महिलेने जेवण करण्याच्या बहाण्याने निकिताला शेतात बोलावून घेतले. त्या ठिकाणी आकांक्षा ढेरे हिच्या सहाय्याने ट्रॅक्टर ड्रायव्हर असणा-या गोट्या बच्चु बामदळे याने निकितावर अत्याचार केले आणि नंतर तिला शेतातील विहिरीत ढकलून दिले. गुरुवारचा बाजाराचा दिवस असल्याने यावेळी गावात शुकशुकाट असल्याचा फायदा आरोपींनी घेतला.
उशिरापर्यंत निकिता घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दुसºया दिवशी ३ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी आकांक्षा मनोहर ढेरे, गोटू बच्चु बामदळे आणि मनोहर संदीपान ढेरे या तिघांवर पाटोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.