अंबाजोगाई नगरपरिषदेत विविध कामांत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:31+5:302021-07-31T04:34:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : नगरपरिषदेत स्वछता, पाणीपुरवठा, खरेदी, बांधकाम कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणाच्या तक्रारी ...

Misconduct in various works in Ambajogai Municipal Council | अंबाजोगाई नगरपरिषदेत विविध कामांत गैरव्यवहार

अंबाजोगाई नगरपरिषदेत विविध कामांत गैरव्यवहार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : नगरपरिषदेत स्वछता, पाणीपुरवठा, खरेदी, बांधकाम कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाला आहे. या सर्व प्रकरणाच्या तक्रारी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक सारंग पुजारी व नगरसेवक शेख रहीम यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

अंबाजोगाई नगरपरिषदेने कोरोनाकाळात कामे न करता स्वच्छता विभागातील देयके काढली. शहरातील झारेगल्ली, धनगर गल्ली, बोरूळ तलावाशेजारी असणाऱ्या स्मशानभूमी, एपीजे अब्दुल कलाम सभागृहासमोर विद्युत व्यवस्थेचा ठराव घेऊनही निधी दिला नाही. सॅनिटायझर फवारणी अल्प प्रमाणात केली. साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करणे आवश्यक असताना फॉगिंग मशीन बंद, नादुरुस्त असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परिणामी शहरात डेंग्यू व चिकनगुनियासारखे आजार वाढू लागले आहेत, असा आरोप करीत पाणीपुरवठा विभागाच्या विहिरी कारखाना परिसरात आहेत. त्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी १८ लाख ५० हजार रुपये एवढे देयक दाखविल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला आहे.

नगरपरिषदेने स्वछता विभागाच्या कामातही मंजुरीपेक्षा ९० लाखांचे देयक अधिक दाखविले आहे. स्वच्छतेचे काम करताना कचरा वाहून नेण्यासाठी ज्या वाहनांचा वापर करण्यात आला. त्या वाहनांचे क्रमांकही कार व जीपचे आहेत. या गैरव्यवहारात पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचे म्हटले आहे. नगरपरिषदेत स्वछता विभागासह इतरही विभागांत अनियमितता झाल्याची कागदपत्रे पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचे सारंग पुजारी व शेख रहीम यांनी सांगितले. तर, आ. नमिता मुंदडा यांनीही या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भूखंड, अनियमित बांधकाम, बोगस ठराव याबाबत संबंधिताविरुद्ध अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही पुजारी व रहीम यांनी दिला आहे.

यावेळी नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा उपस्थित होते.

....

केवळ राजकीय दृष्टिकोनातून आरोप

अंबाजोगाई नगरपरिषदेत गेल्या २५ वर्षांपासून मी काम करीत आहे. ही कामे करताना कुठेही कसला गैरव्यवहार झालेला नाही. होणारे आरोप हे केवळ राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून केले जात आहेत.

-राजकिशोर मोदी, प्रभारी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.

Web Title: Misconduct in various works in Ambajogai Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.