शेत आखाड्यावर दुष्कृत्य; घरात घुसून मजूर महिलेवर दोघांचा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:38 PM2022-04-28T15:38:35+5:302022-04-28T15:41:30+5:30
दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
परळी (बीड) : शेत आखाड्यावर कामावर असलेल्या महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी तालुक्यातील मिरवट येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सज्जन मुकिंदा तिडके ( रा भोगलवाडी तालुका धारूर ) व अंगद केशव भदाडे ( रा मिरवट तालुका परळी) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, परळी तालुक्यातील मिरवट येथील शेत आखाड्यावर एक कुटूंब कामावर आहे. बुधवारी आखाड्यावरील घरात महिला एकटी होती. ही संधी साधत सज्जन तिडके आणि अंगद भदाडे याने घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. बुधवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात सज्जन तिडके व अंगद भदाडे या दोघांविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे करीत आहेत.