मनोरा टाॅवर उभारताना शेतकऱ्यांची दिशाभूल शेतकऱ्यांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:19+5:302021-02-10T04:34:19+5:30
220 के.व्ही परळी वैजनाथ- गिरवली वाहिनी व 132 के.व्ही परळी -गिरवली वाहिनीसाठी मनोरा व्याप्त क्षेत्र व मनोरा तारा ...
220 के.व्ही परळी वैजनाथ- गिरवली वाहिनी व 132 के.व्ही परळी -गिरवली वाहिनीसाठी मनोरा व्याप्त क्षेत्र व मनोरा तारा गेल्याने व तारेने व्याप्त क्षेत्र हे जलालपूर येथील देशमुख यांच्या मालकीच्या ताब्याच्या जमिनीमध्ये येत आहे. या क्षेत्राबाबत जमिनीची करण्यात आलेली मोजणी व त्याबाबतचे मूल्यांकनबाबत आक्षेप असल्याचा अर्ज उपविभागीय अधिकारी परळी यांच्याकडे तेजस देशमुख, नागोराव देशमुख, अभिजीत देशमुख, सूनील देशमुख रां नेहरू चौक परळी यांनी दिला आहे. या अर्जात देशमुख यांनी असे पुढे म्हटले आहे की, महापारेषण कंपनीने जमीन मालकास पूर्वसूचना न देता जवळपास ६०ते ७० टक्के काम जानेवारी २० मध्ये पूर्ण केले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये याचिका तेजस देशमुख व इतर जमीन मालकांनी दाखल केली असतानाही सदर कंपनीने पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज केलेले आहेत. महापारेषण कंपनीने जमिनीचे मूल्यांकन करून जमीन संपादित करून मावेजा दिल्यावर काम सुरू करावे अशी मागणीही तेजस देशमुख यांनी केली आहे. याप्रकरणी महापारेषण कंपनीचे परळीतील अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की महापारेषण कंपनीच्या वतीने त्यांना योग्य तो मोबदला देशमुख यांना देणार आहोत,जमीन मालकाची पूर्व परवानगी घेऊनच काम सुरू केले आहे.