जिवाची पर्वा न करता ‘मिशन झीरो डेथ’ सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:33 AM2021-04-24T04:33:56+5:302021-04-24T04:33:56+5:30

माजलगाव : प्रशासनाच्या आदेशानुसार माजलगाव तालुक्यातील १८० शिक्षक ‘मिशन झीरो डेथ’ मोहिमेत सर्वेक्षण करत आहेत. आरोग्य विभागाने कोणतीही सुविधा ...

‘Mission Zero Death’ survey regardless of life | जिवाची पर्वा न करता ‘मिशन झीरो डेथ’ सर्वेक्षण

जिवाची पर्वा न करता ‘मिशन झीरो डेथ’ सर्वेक्षण

Next

माजलगाव

: प्रशासनाच्या आदेशानुसार माजलगाव तालुक्यातील १८० शिक्षक ‘मिशन झीरो डेथ’ मोहिमेत सर्वेक्षण करत आहेत. आरोग्य विभागाने कोणतीही सुविधा पुरवलेली नसताना शिक्षकांनी जिवाची पर्वा न करता स्वखर्चातून सुरक्षा व दक्षतेचे उपाय केले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्याबरोबरच मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी ‘मिशन झीरो डेथ’ चा पहिला टप्पा १९ एप्रिल ते १० मे दरम्यान राबविला जात आहे. माजलगाव शहरासह ९० गावे, वाडी, वस्ती, तांड्यांवर घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाने कोणतीही सुविधा पुरवली नसताना शिक्षक जिवाची पर्वा न करता ग्लोज, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गण इत्यादी साहित्य स्वत: खरेदी करून राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. तालुक्यातील मंगरूळ नं. १ येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बन्सी रणदिवे, अविनाश येळंबकर, केशव बादाडे, सचिन डुडुळे, वासंती सरवदे, संगीता राठोड, गंगासागर राऊत, अंगणवाडी ताई जयश्री थेटे, यमुना राठोड, आशा वर्कर उषा अवसे आदींसह इतर शिक्षक भरउन्हात कर्तव्य बजावत योगदान देत आहेत.

सर्वेक्षणातून थंडी, ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्याचा त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, ऑक्सिजन पातळी कमी अशी काविडसदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी पाठवणे, तपासणी करणे, लसीकरण वाढवणे, उपाययोजना करून मृत्यूदर शून्यावर ठेवणे हा मूळ उद्देश आहे.

नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. नियमांचे पालन केले तरच ही मोहीम यशस्वी होईल.

===Photopath===

230421\purusttam karva_img-20210420-wa0033_14.jpg

Web Title: ‘Mission Zero Death’ survey regardless of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.