आमदार संदीप क्षीरसागर यांची २० वर्षांपूर्वीच्या 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 04:05 PM2021-09-30T16:05:18+5:302021-09-30T16:09:00+5:30

MLA Sandeep Kshirsagar News : १२ ते १३ सप्टेंबर २००१ दरम्यान विद्यापीठातील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवलेल्या अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांची अदलाबदल करण्यात आली होती.

MLA Sandeep Kshirsagar acquitted of 'Ya' crime 20 years ago | आमदार संदीप क्षीरसागर यांची २० वर्षांपूर्वीच्या 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

आमदार संदीप क्षीरसागर यांची २० वर्षांपूर्वीच्या 'या' गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

googlenewsNext

औरंगाबाद : अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना २००१ साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्ह्यातून बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर ( MLA Sandeep Kshirsagar ) यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ( Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university) तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. माधव गुमास्ते यांनी २५ सप्टेंबर २००१ रोजी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १२ ते १३ सप्टेंबर २००१ दरम्यान विद्यापीठातील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवलेल्या अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांपैकी १११०८० या क्रमांकाची उत्तरपत्रिका कोणी तरी चोरून त्याजागी बनावट उत्तरपत्रिका ठेवल्याची माहिती पहारेकऱ्याने त्यांना दिली होती. बदललेली उत्तरपत्रिका क्षीरसागर या विद्यार्थ्याची होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. बी. शिरसाठ यांनी १२ मे २००३ ला दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी कामात अडथळा, माजी नगरसेवकाला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंड

बॅडमिंटन हॉलभोवती कडेकोट बंदोबस्त होता. तेथे कोणीही जाऊ अथवा उत्तरपत्रिका बदलू शकत नव्हते. पहारेकऱ्याचा जबाब घेतला नाही. बदललेल्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर संदीपचे नसल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे, आदी बचावांचे मुद्दे ग्राह्य धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. आ. क्षीरसागर यांच्यातर्फे ॲड. के. जी. भोसले यांनी काम पाहिले.

मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर; ५० टक्के खरीप क्षेत्र पाण्याखाली

Web Title: MLA Sandeep Kshirsagar acquitted of 'Ya' crime 20 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.