आमदाराने बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली; वाचा काय कारण आहे या गांधीगिरीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:00 PM2020-09-03T16:00:58+5:302020-09-03T16:01:59+5:30

बारा गावातील सुमारे ९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कजार्साठी फाईल दाखल आहेत.

The MLA washed the bank manager's feet and laid flowers; Read what is the reason for this Gandhigiri | आमदाराने बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली; वाचा काय कारण आहे या गांधीगिरीचे

आमदाराने बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली; वाचा काय कारण आहे या गांधीगिरीचे

Next
ठळक मुद्देपीककर्जाची केवळ ५० प्रकरणे मंजूर केली आहेत.

आष्टी : रखडलेल्या पीक कर्ज प्रक्रियेमुळे लोकप्रतिनिधीने बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून गांधीगिरी केली. बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर पाय धुतानाचा व्हिडीओ  व्हायरल झाला. 

तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील एस.बी.आय. च्या शाखेमध्ये बारा गावातील सुमारे ९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कजार्साठी फाईल दाखल आहेत. यापैकी केवळ ५० प्रकरणे मंजूर केली आहेत. या मंदगतीच्या कामामुळे आणि शेतक-यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बँक व्यवस्थापकाचे पाय धुवून विनंती करत आ. धस यांनी गांधीगिरी केली. 

Web Title: The MLA washed the bank manager's feet and laid flowers; Read what is the reason for this Gandhigiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.