बीडमध्ये मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:04 AM2019-07-23T01:04:28+5:302019-07-23T01:04:37+5:30

सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

MNS agitation in Beed | बीडमध्ये मनसेचे आंदोलन

बीडमध्ये मनसेचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगामातील पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी मोठी मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप करीत सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकºयांना तात्काळ पीककर्ज द्यावे, पीकविमा भरणा-या शेतक-यांना दोन्ही हंगामातील पीकविम्याचा पूर्ण हप्त शासनाने भरावा, शेतक-यांना वेठीस धरणा-या बँकांवर गुन्हे नोंदवावेत, बीड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मुद्रा लोन तात्काळ देण्यात यावे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, बीड शहरातील खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत, भुयारी गटार योजनेची कामे गतीने व दर्जेदार करावीत यासह इतर विषयाच्या संदर्भात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. शैलेश जाधव, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, अशोक तावरे, सदाशिव बिडवे, कैलास दरेकर, वर्षा जगदाळे, रेखा अंबुरे, संगीता येवले, अभिषेक गोल्हार, अशोक सुरवसे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: MNS agitation in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.