गेवराईत शाळा सुरू करण्यासाठी मनसेचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:55+5:302021-09-05T04:37:55+5:30
गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या ...
गेवराई : कोरोनाच्या सबबीखाली तब्बल दोन वर्षांपासून जि.प.च्या शाळा बंद आहेत. श्रीमंत लोकांचे मूल ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना मोबाईल घेणं शक्य नसल्याने सरकारने तत्काळ जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी शनिवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली गटशिक्षण अधिकारी कार्यालयात घंटानाद आंदोलन केले.
एकीकडे शासनाने हॉटेल, बार, मॉल, तसेच इतर सर्व आस्थापना सुरू केल्या आहेत. परंतु, शिक्षण हा मुख्य भाग असूनही ते सुरू करीत नाही. आज जरी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असले तरी हे ऑनलाईन शिक्षण मोबाईलअभावी ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येत नाही. यामुळे गरीब व श्रीमंत दरी वाढत असून, विद्यार्थी बालवयात निराशावादी होत आहेत. ही फार गंभीर बाब असून, शासनाच्या वतीने स्वतः पैसे कमाविण्याचा योजना चालू आहेत. यामध्ये गणवेश वाटप, खिचडी वाटप, पुस्तक वाटप या माध्यमातून अनेकजण पैसे कमावत आहेत. आम्ही काळजी घेतो हे भासविण्याचा प्रयत्न आहेत. मात्र, असा दिखाऊपणा बंद करून शाळा सुरू करा नाहीतर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ब्रॉडबँड कनेक्शन, टॅब, कॉम्पुटर सर्व व्यवस्था उपलब्ध करून घ्या, अशी मागणी करीत यावेळी प्रचंड घंटानाद व घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, उपजिल्हाध्यक्ष नीलकंठ वखरे, तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, शेतकरी तालुकाध्यक्ष कृष्णा राठोड, संतोष सावंत, गणेश पवार, रवी मरकड, अशोक बेडके, विकास राऊत, विठ्ठल पट्टे, विशाल देशपांडे, सोपान राठोड, दत्ता जाधव, यदा गाडे, आदी उपस्थित होते.
040921\sakharam shinde_img-20210904-wa0018_14.jpg
गेवराईत शाळा सुरु करण्यासाठी मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.