अनुदान वाटप प्रकरणी मनसेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:27 AM2018-10-03T00:27:38+5:302018-10-03T00:28:13+5:30
जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वाटपात, अनियमितता व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील आष्टी नगर पंचायत अंतर्गत राबवण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वाटपात, अनियमितता व १ कोटी ९ लाख ५५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सहभागी असणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.
वैयक्तिक शौचालयाचे लाभार्थी निवडताना कुटुंबातील वस्तुस्थिती लपवून नोकरदार, घरकुल लाभार्थी, पुर्वी योजनेचा लाभ घेतलेले कुटुंब, अनेक ठिकाणी जुनी शौचालये नविन पद्धतीने कल्याचे दाखवून लाभ देण्यात आला असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला.
या भ्रष्टाचारमध्ये सहभागी असणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री, आयुक्त यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. मात्र कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडे यांनी सांगितले. यावेळी निवेदनाची दखल घेऊन शासनाकडून कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष वैभव काकडे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे, कैलास दरेकर, भाऊसाहेब मेटे, जयदीप मिसाळ, विरेंद्र भालेराव, अनिल जाधव, संपत सायकड, महेश अनारसे, रवी माने, संगीता येवले, सत्यवती ठाकुर, माया पाटील, विशाल शिंदे, मारोती दुनगू, मच्ंिछद्र गर्जे, गणपती खोटे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.