मोबाइल, दुचाकी चोर सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:20+5:302021-04-28T04:36:20+5:30
रस्त्याची दुर्दशा बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता; मात्र बायपास झाल्यामुळे ...
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता; मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक गावांमध्ये नाल्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
गतिरोधकाची दुर्दशा
बीड : शहरातील मुख्य भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेले गतिरोधक दुरुस्तीला आले आहेत. गतिरोधक खराब झाल्याने गतीला आवरणे कठीण झाले आहे. यामुळे शहरात नव्याने गतिरोधक तयार करण्याची मागणी होत
आहे.
रस्त्यावर धुळीचे थर
परळी : शहरात सर्वत्र रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच नागरिकांना याचा त्रास होत आहे. नगर परिषदेने रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करून रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी आहे.