मोबाइल रेंज मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:36+5:302021-02-06T05:01:36+5:30
दारू विक्री बंद करा आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार ...
दारू विक्री बंद करा
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
स्वच्छता होईना
बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी वाढतच चालली आहे. हा कचरा पालिकेतर्फे नियमित स्वच्छ केला जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे.
नेकनूर परिसरातील नद्यातून वाळू उपसा
बीड : तालु्क्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे संबंधित महसूल विभाग व नेकनूर पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा वाळूचा उपसा बंद करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. तरीही अद्याप याबाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिक वैतागले आहेत. याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.