मोबाईल रेंजची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:53+5:302021-06-19T04:22:53+5:30
दारू विक्री वाढली आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू ...
दारू विक्री वाढली
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. तरीही अद्याप या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
स्वच्छतेची मागणी
बीड : शहरातील अनेक ठिकाणी तसेच सहयोगनगर, स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी वाढतच चालली आहे. हा कचरा पालिकेतर्फे नियमित सफाई केला जात नसल्याने यात आणखी भर पडत आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्व्हरसिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने पाण्याचे डोह साचल्याने डास झाले आहेत. यामुळे त्रास आहे.