माजलगावात सराईत मोबाइल चोर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:21+5:302021-04-26T04:30:21+5:30

माजलगाव शहरात लॉकडाऊन काळात हनुमान चौक भागात २३ एप्रिल रोजी रोहित विनोद लोखंडे हा तरुण भाजी खरेदी करताना त्याच्या ...

Mobile thief arrested in Majalgaon | माजलगावात सराईत मोबाइल चोर पोलिसांच्या ताब्यात

माजलगावात सराईत मोबाइल चोर पोलिसांच्या ताब्यात

Next

माजलगाव शहरात लॉकडाऊन काळात हनुमान चौक भागात २३ एप्रिल रोजी रोहित विनोद लोखंडे हा तरुण भाजी खरेदी करताना त्याच्या खिशातून रेडमी नोट ९ प्रो हा बारा हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात व्यक्तीने लंपास केला. या घटनेनंतर विनोद लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत असताना गांधीनगर, बीड येथील सत्यवान भगवान लष्करे हा तरुण संशयास्पद रीतीने फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. लॉकडाऊन असताना बीड सोडून येथे कसा आला व मोबाइल बाबतीत विचारणा केली असता याचे उत्तरे न देता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या चोरी प्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला असून तपास सहायक फौजदार एस. बी. शेटे हे करत आहेत. दरम्यान पकडलेला आरोपी पोलीस रेकॉर्डनुसार सराईत मोबाइल चोर असून बीडसह इतर जिल्ह्यातदेखील त्याच्यावर मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्याच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Mobile thief arrested in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.